कचरा प्रश्न औरंगाबाद: मशीन घेण्यास पैसे नसताना उपमहापौरांंनी घेतली १६ लाखाची कार

औरंगाबाद: शहरात कचऱ्याचे ढिगार ठिकठिकाणी साचले असतांना कचरा प्रश्न सोडवण्याएवजी  उपमहापौर विजय औताडे यांच्यासाठी जवळपास सोळा लाख मोजून टाटा हेक्सा या कंपनीची गाडी घेण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी ही मंडळी पर्यटन ही करून आली. शहर कचऱ्यामध्ये खितपत पडले असताना पालिकेचे पदाधिकारी मौजमजा करत आहेत.

शहरातील कचराकोंडी सारखा महत्वाचा प्रश्न सोडवण्यात पालिका यंत्रणेला व पदाधिकाऱ्यांना यश आलेले नाही. सामान्य नागरिक कचरा समस्येमुळे त्रस्त आहे. एकिकडे मनपाकडे मशीन खरेदीसाठी पैसै नाहीत. पालिकेच्या बँक खात्याची स्थिती उणे सोळा लाख आहे. असे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे शासनाने यंत्र खरेदीसाठी दहा कोटी दिले होते. मग गाडी कशासाठी खरेदी केली मनपा अधिकाऱ्याचे लाड कशासाठी होत आहेत ? असा प्रश्न सामन्य नागरिकाला पडला आहे.

यासंदर्भात एमआयएमचे विरोधी पक्षनेते फिरोज खान म्हणाले, औरंगाबाद मध्ये विकासाची कामे ठप्प असून मनपाकडे पैसा नसतांना अधिकाऱ्यांसाठी गाड्या खरेदी केल्या जात आहेत. मनपा कर्मचाऱ्यांचे पगार दिलेले नाहीत. तसेच कचरा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही आणि पदाधिकाऱ्यांवर उधळपट्टी केली जात आहे. यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत यांना मनपाकडून महिन्याला पेट्रोलभत्ता ही मिळतो. तरी नवीन गाडी कशाला हवी. मी आयुक्तांना या संबंधी पत्र पाठवले असून आम्ही याचा निषेध करतो.

व्यवसायिक स्वप्नील चक्रे म्हणाले, शहर कचऱ्यामध्ये खितपत पडले असताना अधिकारी मजा कशी काय करू शकतात. अश्या पदाधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी व कचरा प्रश्न लवकर सोडायला हवा.

You might also like
Comments
Loading...