मतमोजणीदरम्यान कोल्हापुरातून उपमहापौर व नगरसेवक असणार हद्दपार

कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे ला जाहीर होणार आहेत. अशातच कोल्हापूरमध्ये अंतर्गत सुरक्षा लक्षात घेत कोल्हापूर पोलिसांनी उपमहापौरांसह आजी-माजी नगरसेवक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांना हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत.

पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये ‘तुमच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांचे व संभाव्य हालचालीचे अवलोकन केल्यानंतर आमची अशी धारणा झाली आहे की, निवडणूक निकालाच्या काळात तुमच्या हालचाली आणि कारवायांमुळे सामाजिक स्वास्थ्य व सुरक्षिततेस धोका पोहोचण्याचा संभव आहे. तसेच, तुमच्या उपस्थितीमुळे आणि कारवायामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे’ असं म्हणण्यात आले आहे.

दरम्यान, कोल्हापुरात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकंगणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या दोनही ठिकाणी अतीतटीच्या लढती होत आहेत त्यामुळेच पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.