लाचखोर उपजिल्हाधिकारी गायकवाडचा जामीन फेटाळला, कोठडीत रवानगी

बीड : वाळूची वाहने सुरू ठेवण्यासाठी माजलगावचा उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड याने ६५ हजार रुपयांची लाच घेतली होती. याप्रकरणी अटकेत असलेल्या गायकवाडची माजलगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. गायकवाड याने केलेला जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड याने वाळूची वाहने सुरू ठेवण्यासाठी ६५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. जालना येथील पथकाने दि.१८ फेब्रुवारी रोजी माजलगावात सापळा लावला होता. चालक लक्ष्मण काळे यांच्यामार्फत गायकवाड यांनी लाच स्वीकारली होती. एसीबीने चालक काळे व उपजिल्हाधिकारी गायकवाड यांना अटक केली होती. शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली गेली होती.

उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याने जामिनासाठी अर्ज केला. आरोपी जामिनावर सुटल्यास सदर कागदपत्रे मिळण्यात अडचण येऊ शकते असा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करीत सत्र न्या.अरविंद वाघमारे यांनी श्रीकांत गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

महत्त्वाच्या बातम्या