सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १५ दिवसात ११० किलोमीटर जमिनीचे सिमांकन करा – उपमुख्यमंत्री

मुंबई : उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी येत्या 15 दिवसात 110 किलोमीटर जागेचे सिमांकन करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल. उजनी जलाशय जवळ पंप हाऊस व जॅकवेल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने 0.25 हेक्टर जागा त्वरित महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. जमिनीचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Loading...

उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करताना अनेक ठिकाणी ही भूमिगत पाईपलाईन शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या पाईपलाईनचे काम करावे व शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सोलापूर शहरासाठी उजनी ते सोलापूर समांतर 110 दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात सोलापूर शहरासाठी वितरण व्यवस्था सुधारण्यात येणार आहे. सुमारे 464 कोटी रुपयांची ही योजना असून योजनेतून प्रतिदिन 110 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेमुळे सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे – पाटील ,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका