सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू – अजित पवार

मुंबई : मराठी भाषा दिन साजरा करत असताना, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा जागर करणाऱ्या स्वरमयी सोहळ्यास विधिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित केले.

Loading...

आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज्यातील तसेच देशातील सर्व मराठी भाषा प्रेमींना शुभेच्छा देतो, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा विधान परिषदेत एकमताने मंजुर केल्याबद्दल आनंद वाटतो. मराठी भाषा सक्तीची केल्याने पुढील काळात मराठी भाषेला शक्ती देण्याचे काम होईल, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. मराठी भाषा दिनी कविवर्य कुसुमग्रज यांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या जन्मदिवसाचा गौरव म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो, असे वक्तव्य करत अजितदादांनी कवी कुसुमाग्रज यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

मराठी भाषेचे मोठेपण संत ज्ञानेश्वरांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी गेली अनेक वर्षे आम्ही करत आहोत. गेली पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असतानाही ती मागणी दुर्दैवाने पूर्णत्वाला जाऊ शकली नाही. मराठी माणसाला संघर्षाव्यतिरिक्त काहीच मिळालेले नाही. पुढील काळात मराठी माणसाने संघर्षाची तयारी ठेवायला हवी. मराठी भाषेचे गौरव वाढवणे हे आपल्या हातात आहे. आपल्या घरातून याची सुरुवात करणे गरजेचे आहे. लहान मुलांकडून मराठी संस्कृतीचे जतन होईल, याकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडे राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ पाठवून मागणी केली आहे. मराठी भाषा ही ओठातून येऊन उपयोग नाही, ती पोटातून यायला हवी. मराठी भाषेत पोट भरण्याचे सामर्थ्य असणे गरजेचे आहे. ही भाषा व्यापार-उद्योगात आणि संगणकीय वापरात उपयोगात येण्याची गरज असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले. कोणत्याही देशावर हल्ला करायचा म्हटला तर त्याच्या संस्कृतीवर पहिला हल्ला केला जातो. तेच इंग्रजांनी केले आणि आपल्या देशात इंग्रजी भाषा सक्तीची झाल्याचेही अजित पवार म्हणाले.

तसेच पुढे जाणाऱ्या नवीन पिढीला मराठी भाषा बोलता येते पण वाचता येत नाही. त्यामुळे पुढील काळात काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येणे कठीण आहे. मराठी नाटक-चित्रपट क्षेत्रात चांगले प्रयोग होत आहेत. राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नेहमीच पाठिंबा देणार तसेच आज मराठी भाषा दिन साजरा करताना बेळगाव सीमेवरील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार उभे राहील, अशी विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका