मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar tests positive ) काल कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही अजित पवारांनी केले. मात्र यावरच औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनी अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्या, असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
दादा तुम्ही बिलकुल चिंता करू नका,महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी एका दिवसात करोनाला बरे करत मातोश्री वर मीटिंग घेतली, वर्षा ते मातोश्री प्रवास लोकांच्या मध्ये मिसळून केला,त्यामुळे तुम्ही लगेच मुख्यमंत्री साहेबांनचा सल्ला घ्या@AjitPawarSpeaks
राजकीय सोडा काळजी घ्या दादा https://t.co/aSYwHCA5UX
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) June 28, 2022
“दादा तुम्ही बिलकुल चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी एका दिवसात कोरोनाला बरे करत मातोश्री वर मीटिंग घेतली, वर्षा ते मातोश्री प्रवास लोकांच्या मध्ये मिसळून केला, त्यामुळे तुम्ही लगेच मुख्यमंत्री साहेबांचा सल्ला घ्या. राजकीय सोडा काळजी घ्या दादा.”, असे ट्वीट सुमित खांबेकर यांनी केले आहे.
दरम्यान “काल मी कोरोनाची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.”, असे ट्वीट अजित पवारांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Mumbai : धक्कादायक! मुंबईत चार मजली इमारत कोसळली, २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकले
- Sanjay Raut : “…पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारेल का?” ; संजय राऊतांचा बंडखोरांवर निशाणा
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?
- Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
- Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<