बंगालमध्ये राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट झालं जप्त

rahul gandhi

कोलकाता – चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेस,तामिळनाडूत द्रमुक, केरळमधे डावी लोकशाही आघाडी, पुदुच्चेरीमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तर आसाममधे भाजपानं बाजी मारली आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमधे सत्ताधारी पक्षांनी सत्ता कायम टिकवली आहे. तर तामीळनाडू आणि पुदुच्चेरीमधे सत्ता परिवर्तन होत असल्याचे संकेत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली आहे. भाजपानं देखील बंगालमध्ये मोठी मुसंडी मारली आणि दुसरा क्रमांक पटकावला. डावी आघाडी, काँग्रेस आणि नवनिर्मित इंडियन सेक्युलर फ्रंट अर्थात तिसरी आघाडी यांची अतिशय मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पश्चिम बंगालमध्ये एकही जागा मिळाली नाही.

दरम्यान, तिसऱ्या आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी बऱ्याच उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झालीय. इतकचं नाही तर ज्या दोन मतदारासंघांसाठी राहुल गांधींनी प्रचारसभा घेतल्या त्यान दोन्ही मतदारसंघांमध्येही काँग्रेसचा पराभव झाला असल्याचे आता समोर येत आहे.

तिसऱ्या आघाडीतील सदस्य पक्ष असणाऱ्या भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाने काँग्रेस आणि डाव्या घटक पक्षांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना पश्चिम बंगालमध्ये एका जागेवरही विजय मिळवता आलेला नाही.

राहुल यांनी दोन ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या होत्या.१४ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्सलबाडी आणि गोलपोखर या दोन मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र या ठिकाणीही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. या मतदारसंघांमधून लढणाऱ्या उमेदवारांनाही आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही.

माटीगारा-नक्सलबाडीचे आमदार असणाऱ्या शंकर मालाकार यांना केवळ ९ टक्के मत मिळवत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. गोलपोखरमध्येही काँग्रेच्या उमेदवाराला केवळ १२ टक्के मतं मिळवता आली. येथेही काँग्रेस तिसऱ्या स्थानीच राहिली.

महत्त्वाच्या बातम्या