छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ३८ लाख ५२ हजार खातेधारकांच्या खात्यात रक्कम जमा

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत 38 लाख 52 हजार खातेधारकांच्या बँक खात्यात 14 हजार 983 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे.

शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 जाहीर केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु 2008 आणि 2009 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. तसेच 2001 ते 2016 या कालावधीत इमूपालन, शेडनेट आणि पॉलिहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेत आतापर्यंत 38 लाख 52 हजार खातेधारकांच्या बँक खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यात आली आहे. उद्या या योजनेत सहभागाची अंतिम मुदत आहे.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस.मदान, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...