नवी दिल्ली : भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्या भेटीत विधानसभा निवडणुकीवेळी पश्चिम बंगालमध्ये केवळ केंद्रीय सशस्त्र पोलीस दले तैनात करण्याचे साकडे घालण्यात आले.
निवडणूक मुक्त वातावरणात होण्यासाठी आणि त्या प्रकियेची प्रतिष्ठा जपण्यासाठी केंद्रीय दलांची सुरक्षा आवश्यक असल्याचे पक्षाकडून नमूद करण्यात आले. बंगालच्या पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय निरीक्षकांकडे सोपवावी, असा आग्रहही भाजपने धरला आहे. बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार मुकाबला होईल, असे सध्याचे चित्र आहे. अर्थात, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्यांची आघाडीही मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.
बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीमुळे आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि काही खासदारांचा समावेश असणाऱ्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यावेळी एक निवेदन सादर करून भाजपच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी राम मंदिरासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी !
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय