fbpx

तलाठी सुधाकर राजगुरू यांची विभागीय चौकशी

सोलापूर : भोगाव येथील बोगस उताऱ्याप्रकरणी तलाठी सुधाकर राजगुरू यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला अाहे.

ज्येष्ठ नागरिकाने फसवणूक झाल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून राजगुरू यांना म्हणणे मांडण्याची दोनवेळा संधी देऊन दुर्लक्ष केल्याने अाता विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार अाहे. भोगाव येथील नीलेश पाटील यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक निवृत्ती व्हटकर यांनी खरेदी घेतला होता.

आॅनलाइन संगणक उताऱ्यामुळे प्रत्यक्ष प्लाॅटच अस्तित्वात नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार व्हटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. चौकशीत तलाठ्याने बोगस उतारे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तलाठ्यावर फौजदारी कारवाई का नाही असा सवाल उपस्थित होत अाहे. शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यापूर्वी प्रकरणाची चौकशी होणे अनिवार्य असते. राजगुरू यांची विभागीय चौकशी हा त्याचाच भाग आहे, शिवाजी जगताप यांनी सांगितलेे.