रसायनशास्त्र, भुगोल विभागाने परंपरा राखली, ‘सेट‘चा निकाल जाहीर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र व भुगोल विभागाने राज्यस्तरीय पात्रता चाचणीत पात्रेतची विभागाची परंपरा कायम राखली आहे. या दोन्ही विभागाने अनुक्रमे १२ व ७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने २७ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या राज्य पात्रता चाचणीचा सेट निकाल बुधवारी रात्री घोषित झाला.

यामध्ये रसायनशास्त्र विभागातील १२ विद्यार्थी पात्र ठरले. तर भुगोल विभागातील सात विद्यार्थी पात्र झाले. रसायनशास्त्र विभागाच्या ‘सेट, नेट, गेट‘ मध्ये यशस्वी होण्याची मोठी परंपरा आहे. आजपर्यत ५०० हून अधिक जण पात्र ठरले आहेत. यापैकी अनेक जण एनसीएल, पुणे या सारख्या राष्ट्रीय संस्थामध्ये संशोधन करीत आहेत, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. मच्छिंद्र लांडे यांनी दिली. पात्र विद्यार्थ्यांमध्ये नरेंद्र सुरसे, कृष्णा लाठी, रोहिनी अंबुरे, अमोल कुटे, लक्ष्मण खराबे, गणेश देशमाने, सोमनाथ ढवळे, प्रियंका चापकानडे, आकाश टापरे, राहुल भक्ते, कविता चव्हाण, अशोक भोसले यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ.मच्छिंद्र लांडे, डॉ. अंजली राजभोज, डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. सुनिल शंकरवार, डॉ. गिरीबाला बोंडले, डॉ. बापूराव शिंगटे, डॉ. भास्कर साठे तसेच डॉ. अनुसया चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

भुगोल विभागात सात विद्यार्थी पात्र

भुगोल विषयातील सात विद्यार्थी सेट मध्ये पात्र ठरले आहेत. यामध्ये हरिभाऊ विठोरे, प्रतीक्षा मोहिते, मेघा कुलकर्णी, आकाश गिरे, संभाजी ढगे, धनश्री ढवळकर व बापू गुजर समावेश असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. मदनलाल सूर्यवंशी यांनी दिली. बारा वर्षापुर्वी स्थापन झालेल्या या विभागातील एकूण ३६ विद्यार्थी आजपर्यंत सेट – नेट मध्ये पात्र ठरले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे गुणवंत विद्यार्थ्यांचे माहेर घर आहे. राज्य पात्रता चाचणी, राष्ट्रीय पात्रता चाचणी, राजीव गांधी फेलोशिप, सारथी, बार्टी आदी संस्थाची फेलोशिप घेणाऱ्यांमध्ये राज्यात सर्वाधिक विद्यार्थी आपल्या विद्यापीठातील आहेत, ही आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या