राहुल गांधी यांनी आदेश दिला तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यास तयार : देवरा

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आदेश दिला तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यास तयार असल्याचे संकेत माजी खासदार मिलिंद देवरा यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निरुपम राहतात की जातात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मिलिंद देवरा यांनी ही इच्छा बोलून दाखवली.

नेमकं काय म्हणाले देवरा ?
‘सध्या मी काँग्रेस पक्षात विविध पातळ्यांवर काम करत आहे. माझ्या मतदार संघातही लक्ष ठेवून आहे. पण जोपर्यंत राहुल गांधी मला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला सांगत नाहीत, तोपर्यंत मी मला सोपवलेली जबाबदारी आनंदानं पार पाडेन. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सुमार कामगिरी झाली होती. २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे मुंबईत काँग्रेसला सक्षम चेहरा देण्याची गरज आहे’. 

राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या; दाखवला इंगा

मराठा आरक्षणावर हायकोर्टात आज होणार सुनावणी