fbpx

भीम आर्मीच्या सभेला पुण्यात कुठेच परवानगी देऊ नका ; मिलिंद एकबोटेंची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : 30 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये भीम आर्मीने जाहीर सभेचं आयोजन करायचं ठरवलं आहे. या भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद या सभेला उपस्थित राहणार आहे. एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे उसळलेली दंगल लक्षात घेता या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. भीमा कोरेगांव दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाला पत्र लिहून एकबोटे यांनी ही मागणी केली आहे.

31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा इथे एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शहरी नक्षलसमर्थकांविरुद्ध कारवाई देखील केली आहे. एकबोटे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की माओवाद्यांशी संबंध असलेल्या एल्गार परिषदेमुळे जानेवारी 2018 मध्ये हिंसा भडकली होती. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भीम आर्मीला सभेसाठी परवानगी देण्यात येऊ नये कारण या सभेमधून जातीय विद्वेषाची गरळ ओकली जाईल असं एकबोटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.