Share

Sushma Andhare | भाषणाला परवानगी नाकारल्यामुळे, सुषमा अंधारे घेणार थेट कोर्टात धाव

Sushma Andhare | मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची जळगावातील मुक्ताईनगर याठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र अंधारे यांना सभास्थळी जाण्यास मज्जाव केला आहे. त्याचबरोबर त्यांना भाषण करण्यासही मनाई केली आहे.  त्यामुळे सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या सगळ्यावरून आपला संताप व्यक्त केला.जळगावात सुषमा अंधारे यांच्या भाषणांना परवानगी नाकारण्यासाठी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दबाव टाकल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. मात्र आता त्या याविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं समजतं आहे.

काय म्हणाले सुषमा अंधारे (Sushma Andhare)

जळगाव महाप्रबोधन यात्रेच्याप्रसंगी ही महाप्रबोधन यात्रा नसून यात जातीपातीचे राजकारण केलं जातंय असा अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनाशुक्रवारी जळगावात भाषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मी स्वतः ऑनरेबल कोर्टाकडे माझी याचिका दाखल करणार असून कोर्टात माझी भाषा तपासण्याची मागणी करणार आहे. मी या भाषणामध्ये फक्त आणि फक्त संविधानिक कलम महापुरुषांचे विधान त्यांचे कोट आणि संत वचनाचा आधार घेतला. महाराष्ट्र जोडण्याची यासह महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न या महाप्रबोधन यात्रे प्रसंगी केला आहे. त्यामुळे गुलाबराव आता कुठल्या ना कुठल्या कारणासाठी मागे लपत आहेत.

महाराष्ट्र जोडण्याची आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले आहेत. गुलाबराव पाटलांचा हा प्रॉब्लेम हा नाहीये. ते आता जाती-पातीच्या आड लपत आहेत. मध्ये मध्ये ते हिंदुत्वाच्या आड लपत होते. गद्दारी केली तेव्हा. मातोश्रीवाले आम्हाला भेटत नव्हते. निनांद्याला 12 बुद्ध्या म्हणतात, तसलं आहे हे, असं अंधारेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, दरम्यान, सुषमा अंधारे सध्या जळगावातून बीड जिल्ह्यातील परळीत गेल्या आहेत. काल परळीकडे रवाना होताना सुषमा अंधारे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची जळगावातील मुक्ताईनगर याठिकाणी सभा आयोजित करण्यात आली …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now