आरजे मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळय़ा

r j malishka

वेबटीम : ‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय’ या व्हिडिओमुळे प्रकाश झोतात आलेली आर जे मलिष्का आता अडचणीत सापडताना दिसत आहे. मलिष्काच्या घरी केलेल्या तपासणीत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याना डेंग्यूच्या अळय़ा सापडल्या आहे. त्यामुळे महापीलिकेने मलिष्कारला नोटीस बजावली आहे.

बीएमसीने मंगळवारी मलिष्काच्या वांद्य्रातील पालु नाका इथल्या सनराईज इमरातीमधील घारात तपासणी केली.यावेळी घरातातील शोभेच्या कुंडीखालील डिशमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या आळय़ा आढळल्या. यानंतर महापालिकेने मलिष्काला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी मलिष्कावर नियामनुसार कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.