शक्तीप्रदर्शनाचा आणि निर्दोषत्वाचा काहीही संबंध नाही आणि नसतो – मुनगंटीवार

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. मात्र, आज प्रतीक्षा संपली आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.

‘मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. ‘संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन करत आहेत. त्यांनी शक्ती प्रदर्शन जरूर करावे. पण शक्तीप्रदर्शनाचा आणि निर्दोषत्वाचा काहीही संबंध नाही आणि नसतो, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

‘राठोड यांनी मीडियासमोर बोलण्यापेक्षा पोलिसांसमोर जाऊन आपली बाजू मांडावी. यापूर्वीच त्यांनी मी निर्दोष आहे. सीबीआय आणि कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशी करा, मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असं राठोड म्हणाले असते तरी चाललं असतं’, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या