‘मी फिट आहे हवं तर प्रात्यक्षिक दाखवतो’ ; दोन राजेंमध्ये रंगली शाब्दिक जुगलबंदी

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील द्वंद्व उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र साताऱ्यातील जावळी इथं एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही राजे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन केलं आणि शाब्दिक चिमटे काढले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा खांदा दाबला असता शिवेंद्रराजे यांनीही मोठया मनाने त्यांना दाद देत ‘माझा सारखा खांदा का दाबताय’ असं म्हणाले. त्यावर दिलखुलासपणे उदयनराजे भोसले यांनी ‘फिटनेस बघत आहे’ असं उत्तर देत हसले. त्यावर शिवेंद्रराजे यांनी ‘मी फिट आहे हवं तर प्रात्यक्षिक दाखवतो’ अस म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.