लोकशाही खरोखर धोक्यात आली, आपली वाटचाल अराजकतेकडे : राज ठाकरे

raj thakrey

रत्नागिरी ; आज सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेत किती हस्तक्षेप आहे, ते यातून समोर आलं, असं म्हणत लोकशाही खरोखर धोक्यात आली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.रत्नागिरीमध्ये राज ठाकरे बोलत होते.

”चार न्यायमूर्ती जे बोलले ते अत्यंत गंभीर आहे. लोकशाही आता खरोखर धोक्यात आली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगही सरकार चालवतंय हे समोर आलं होतं, आता न्यायव्यवस्थेतील वास्तव समोर आलं आहे. हा देश केवळ अडीच माणसं चालवत आहेत. आपली वाटचाल अराजकतेकडे सुरु असून हे सरकारच्या अंगाशी येईल”, असं राज ठाकरे म्हणाले.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.