देशातील लोकशाही धोक्यात-कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा- सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांवरच टीका केल्यानंतर काँग्रेसने या घडामोडीवर चिंता व्यक्त करताना देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावर आता देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत असून काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही थेट भाष्य करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांवरच निशाणा साधला आहे. अशाप्रकारे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माध्यमांसमोर येण्याची ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरची पहिलीच वेळ आहे.’चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही चिंतेची बाब आहे. देशातील लोकशाहीच धोक्यात आली आहे’, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

You might also like
Comments
Loading...