राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम करणा-या ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी

road work

अहमदनगर, – कल्याण-नगर-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गांतर्गत सध्या नगर ते पाथर्डी दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे.या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात येत आहे. मेहेकरी ते फुंदे टाकळी दरम्यान ठेकेदाराकडून इस्टिमेटनुसार कोणतेही काम होत नाही.आतापर्यंत या हद्दीत झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून ते तात्काळ थांबवून कामाची चौकशी करावी अशी मागणी,पाथर्डी तालुका पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग जात असलेल्या गावातील सरपंच,ग्रामस्थांनी अकोलकर यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये जिल्हा प्रशासनाला निवेदन देवून या संपूर्ण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर पाथर्डी तालुका पंचायत समितीचे सदस्य सुनील ओव्हळ,विष्णुपंत पवार,सरपंच सचिन नेहुल,बाळासाहेब लवांडे,उध्दव माने,मारूती चितळे,देवराज भालसिंग,राजेंद्र गिरी, मच्छिंद्र सोनटक्के,लक्ष्मण काळे,बाबासाहेब खंडागळे आदींच्या सह्या आहेत.

Loading...

डांगेवाडी,जवखेडे,पारेवाडी,अकोला,चितळवाडी,शहापूर,फुंदेटाकळी,मेहेकरी आदी गावातील प्रतिनिधींनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की,मेहेकरी ते फुंदे टाकळी दरम्यान पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण पूर्णपणे उखडले गेले आहे.काम चालू असताना तयार केलेल्या सर्व्हिस रोडवर सुरक्षा फलक,रिफ्लेक्टर लावलेले नाहीत.त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.चुकीच्या कामामुळे आजपर्यंत झालेल्या विविध अपघातांमध्ये ४८ निरपराध लोकांना जीव गमवावा लागला आहे.

शेकडो वाहनधारक व प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले आहे.त्यामुळे सदर ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच अपघातात मयत झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.सदर रस्त्यावर ६२ जुने छोटे मोठे पूल आहेत.यापैकी बहुतांश पुलांची डागडुजी करून पुल नवीन केल्याचे दाखविण्यात आले आहे.अनेक गावात गटारीचे काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे

.त्रिभुवनवाडी येथे डांबर प्लँट सुरू करताना पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.तहसीलदारांनी आदेश देवूनही सदर डांबर प्लँट ठेकेदाराने चालूच ठेवला आहे.याशिवाय करडवाडी शिवारात बेकायदा खडी क्रशर उभारण्यात आले असून त्यासाठी प्रदूषण महामंडळाची आवश्यक परवानगीही घेतली गेलेली नाही.या संपूर्ण कामात ठेकेदार कंपनी संशयाच्या भोव-यात आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने या निवेदनाची दखल घेत निकृष्ट काम थांबवून ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'