महाराष्ट्रातही फटाकेबंदी ; पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे संकेत

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा मध्ये सुद्धा फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेऊ अस रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

फटाक्यांच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे अनेक लोकांच्या कानांचे पडदे फाटतात, तसेच धुरामुळेसुद्धा वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. फटाक्यांमुळे कंपन्यांना आग लागल्याचे प्रकारही समोर आले आहेत. फटाके फोडण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अस पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले आहे.

रामदास कदम यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे , त्यामुळे महाराष्ट्रात फटाक्यांविना दिवाळी साजरी करू या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

You might also like
Comments
Loading...