ईव्हीएम मशीन रद्द करून पुन्हा जुनीच मतदान पद्धत सुरू करण्याची मागणी

EVM

पुणे –  ईव्हीएम मशिन आणि निवडणूक प्रक्रियेतील भोंगळ कारभाराविरुद्ध बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी, ईव्हीएम मशीन रद्द करून पुन्हा एकदा जुनी पद्धत सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

Loading...

देशात १९८२ पर्यंत गुप्त मतदान आणि मतपेटीव्दारे मतदान ही पद्धत सुरू होती. कालांतराने मतदान आणि मतमोजणीमध्ये जाणारा वेळ पाहता ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून मतदान आणि मतमोजणीचे धोरण स्वीकारण्यात आले. पण या मशिनमध्ये उमेदवारांना छेडछाड करणे सोपे जाते, शिवाय यातून लोकशाही धोक्यात येऊन चुकीच्या पक्षांकडे देशाची सत्ता जाते. याची किंमत देशाला आज भोगावी लागत आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारने लोकशाहीचा गळा घोटून देश विकायला काढला आहे, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीने केला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असे आंदोलन करण्यात आले.Loading…


Loading…

Loading...