Udayanraje Bhosale | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत त्यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली होती. यानंतर सर्वत्र संताप पाहिला मिळाला आहे. तसं पाहता असं विधान करण्याची त्यांची पहिली वेळ नसल्याने आता अनेकांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. अशातच उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना तातडीने पदावरुन हटवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा, अशी मागणी उदयनराजे यांनी केलीय. उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचीदेखील पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे, अशी खंत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्देवी आहे. याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Vikram Gokhale । विक्रम गोखले यांचे ८२ व्या वर्षी निधन
- Ajit Pawar | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे विधान खपवून घेणार नाही”; अजित पवार संतापले
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये ‘ही’ योगासन करून शरीर बनवा लवचिक आणि सुदृढ
- Rohit Pawar | “40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात सरकार व्यस्त”; रोहित पवार यांचा हल्लाबोल
- Vikram Gokhale | दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल