कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी विस्तार अधिकारी यांना बडतर्फ करण्याची सीईओ कडे मागणी

औरंगाबाद : गंगापूर पंचायत समितीत कार्यरत असलेले विस्ताराधिकारी मंगेश कुंटे यांनी कामात कसूर केल्या प्रकरणी चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी अनिल मैंद यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

जोगेश्वरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भीमराव भालेराव अधिकाराचा गैरवापर करून शासनाचे आर्थिक नुकसान करत आहे. सरपंच आणि पदाधिकारी यांच्या दबावाखाली काम करून अधिकार नसतानाही विविध प्रमाणपत्राचे वाटप करत आहे. सदर बाबी विस्तार अधिकारी मंगेश कुंटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही विस्तारधिकारीही ग्रामविकास अधिकारी भालेराव यांच्यावर कुठली कारवाई करत नाही, तसेच त्यांना त्यांनी घेतलेल्या सुनावण्यावेळी ग्रामविकास अधिकारी सतत गैरहजर राहून देखील विस्तार अधिकारी कुंटे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही.

त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी विस्तार अधिकारी मंगेश कुंटे यांची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन केली आहे. तसेच येत्या आठ दिवसात दोषींवर कारवाई झाली नाही तर जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील मैंद यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या