आ. किरण लहामटे यांच्यावर तृतीयपंथी यांचा अपमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

kiran lahamate

पुणे : ट्विटरवरून सतत शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे समाचार घेणारे भाजप नेते आणि माजी खा. निलेश राणे हे चांगलेच कचाट्यात सापडले आहेत. एक राजकीय ट्विट करताना हिजडा असा शब्दप्रयोग केल्याने ते अडचणीत आले आहेत. तृतीयपंथी समाजाने जळगावात येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. निलेश राणे यांनी तृतीयपंथी समाजावर उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक वक्तव्य केलं आहे, अशी प्रतिक्रिया शमिभा पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

एका बाजूला हे सर्व प्रकरण सुरु असताना आता अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी ही मागणी केली आहे. २३ मार्च रोजी अकोले तालुक्यातील भरसभेत इंदुरीकर प्रकरणात बोलताना हजारो लोकांसमोर तृतीयपंथीयांविषयी उपहासात्मक बोलून त्यांचा अपमान केला होता, त्याबाबत कोणीही आवाज उठवलेला नाही. त्यासंदर्भात व्हिडिओ उपलब्ध आहेत ,तसेच युट्युब वर सुद्धा भाषण ऐकायला मिळतील असं देसाई यांनी म्हटलं आहे.

#महाराष्ट्रद्रोहीBJP विरुद्ध #MaharashtraBachao जाणून घ्या ट्वीटर वॉर मध्ये कुणी मारली बाजी

‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, तृतीय पंथीयांना समाजात समानतेचे स्थान मिळावे, ती पण माणसेच आहेत त्यांच्याबरोबर भेदभाव होऊ नये यासाठी अनेक वेळा त्यांचे प्रश्न आम्ही जाणून घेतले आहेत ,लॉक डाऊन मध्ये सुद्धा तृतीयपंथी कुटुंबीयांना आमच्या मार्फत आम्ही मदत पोहचवली आहे,त्यामुळे तृतीयपंथीयांचा असा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही.
निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आता राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे.

पुढे त्या म्हणाल्या, " हा अकोले तालुका क्रांतिकारकांचा आहे, आम्ही काय हिजड्याची अवलाद वाटलो का?" असे वक्तव्य या आमदाराने केलेले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालावे,राष्ट्रवादी पक्षातील आमदार जर तृतीयपंथीयांविषयी असे अपमानास्पद बोलत असतील तर पक्षासाठी धोक्याचे आहे.

पुढे त्या म्हणाल्या, राजकीय नेत्यांना सत्तेत असल्यावर सामाजिक भान राहत नाही, याचेच हे उदाहरण.प्रकाशजी आंबेडकर हे सुद्धा तृतीयपंथीयांविषयी आमदार लहामटे यांनी जे वक्तव्य केले आहे ,त्याबाबतीत आपले मत मांडतीलचं, यात काही शंका नाही..तसेच निलेश राणेंवर ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांनीच पुढाकार घेऊन लहामटे यांच्यावर भाषणाच्या व्हिडीओ पुराव्यानुसार तातडीने गुन्हा दाखल करावा.

सोलापूरसाठी सक्षम पालकमंत्री नसल्याने प्रशासन हतबल असल्याचा आरोप