नांदेड – पनवेल रेल्वे सुरू करण्याची मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी

relway

परभणी : कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळे प्रवासी कमी असल्याचे कारण देत बंद केलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागातील मराठवाड्यातून पुण्याला जोडणाऱ्या नांदेड-पनवेल रेल्वेला तात्काळ पूर्ववत सुरू करावे अशी मागणी रेल्वे प्रवाशी महासंघाच्या वतीने केली आहे. तसेच उत्सव आणि विशेष रेल्वेच्या नावाखाली वाढवलेले प्रवासीदर तात्काळ कमी करण्याची मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे.

सोमवारी या संदर्भात एक ऑनलाईन निवेदन रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाडा विभागातील अनेक रेल्वे कमी प्रवासी प्रतिसाद दाखवून बंद केल्या आहेत. विभागातील जनप्रिय गाड्यांपैकी नांदेड – पुणे – पनवेल ही एक प्रमुख रेल्वे आहेत. या रेल्वे ला कधी ब्लॉकच्या नावाखाली, कधी कोरोनाच्या नावाखाली असेच विनाकारण अचानक पणे कधीही रद्द करण्यात येत असल्याने सदर रेल्वे सुरू आहे की नाही या स्थितीत ठेवल्याने प्रवाशी प्रतिसाद कसे मिळणार ? असे या निवेदनात म्हटले आहे.

लोकांना कोरोना बाबत आता कळून चुकले आहेत. लस घेणे, मास्क लावणे, सेनिटाइजर ने साफ सफाई करून घेत आहे. अजून किती दिवस कोरोनाच्या नावाखाली रेल्वे गाड्यांना बंद करणार? तर मास्क लावणे, लस चा काय लाभ? असे प्रश्न प्रवाश्यांकडून होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रवाशी स्वतःच्या काळजीने प्रवास करत आहेत.रेल्वे गाड्यांना अशा प्रकारे रद्द ठेवणे अन्यायकारक असल्याचे मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने निवेदनात म्हटले आहे. रद्द के लेल्या गाड्यांची पुन्हा चालविणे गरजेचे आहे. या विभागातील सर्वात महत्वाची असलेली नांदेड-पुणे- पनवेल ही गाडी तत्काळ सूरु करावी, असे या निवेदनात सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या