औरंगाबाद : शहरातील मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंत डिमांड नोट तयार केल्या जात होत्या. मालमत्ता व पाणीपट्टीचे बील जनरेट केले जात आहे. लवकरच प्रभागनिहाय डिमांड नोट तयार करुन मे अखेरपर्यंत मालमत्ताधारकांचा वाटप केल्या जाणार आहेत, अशी माहिती कर निर्धारक व संकलक अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी बुधवारी (दि.७) दिली.
कोरोनाच्या काळातही मनपाने कर वसूलीस जोरदार सुरुवात केली आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी यंदा सुरूवातीपासून मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कर निर्धारक व संकलक अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा थेटे या नियोजन करत आहेत.
पालिकेच्या प्रभाग कार्यालयातंर्गत प्रत्येक कर्मचार्याकडे पंधराशे मालमत्तांचा कर वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे जे कर्मचारी डिमांड नोटचे वाटप करण्यास मालमत्ताधारकांच्या घरी जातील, त्यांनी मालमत्ताधारकाचे दोन मोबाइल नंबर, ई-मेलची माहिती घेऊन ती कार्यालयात जमा करावी. त्यामुळे मालमत्ताधारकांच्या मोबाइलवर व ई-मेलद्वारे डिमांड नोट पाठवण्याचेही नियोजन केले जात असल्याचे थेटे यांनी सांगितले.
मालमत्ता कर व पाणीपट्टीचे बील जनरेट झाले असून प्रभाग कार्यालयात बीलांची मागणी केल्यास मालमत्ताधारकांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. डिमांड नोट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून प्रभागनिहाय डिमांड नोट तयार केल्या जात आहे. मे अखेरपर्यंत मालमत्ताधारकांना घरपोच डिमांड नोटचे वाटप केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून पळाला आणि..
- वाळूजमध्ये रुग्णवाहिकेचा स्फोट, कुठलीच जीवितहानी नाही
- औरंगाबादेत जम्बो लसीकरण मोहीम संकटात! तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक
- भाजपला महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग जडलाय : अशोक चव्हाण
- सुखद! मालमत्ता करावर एप्रिल महिन्यात १० टक्के, तर मे महिन्यात मिळणार ८ टक्के सवलत