fbpx

परतूर शहरात शिवस्मारकाची मागणी

shivaji maharaj

परतूर / सोपान रोडगे: शेवांग ते पंढरपूर महामार्ग परतूर शहरातून जात असल्याने साईबाबा मंदिर चौक हा शहरातील मुख्य चौक आहे शहराचे पुरातन नाव प्रल्हादपूर होते तेव्हापासून या चौकात काही वडाची झाडे होती परतुरच्या नागरिकांच्या मते ही झाडे परतूर शहराची शान होते परंतु पंढरपूर ते शेगांव या महामार्गाच्या मध्ये आल्यामुळे ही पुरातन वडाची झाडे तोडली गेली आहेत.म्हणून या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे तसेच शहारातील सर्वपक्षीय नेत्यांनी याला संमती देखील दर्शवली आहे. यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर स्मरकाला परवानगी द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत तरी पण परतूर शहरात अजून महाराजांचे एकही स्मारक उभारले गेले नाही म्हणून साईबाबा मंदिर चौकात स्मारक व्हायालाच पाहिजे.
मोहन अग्रवाल ( शिवसेना जिल्हा संघटक )

महाराजांना पाहून भावी पिढीला प्रेरणा मिळत राहील ज्यामुळे तरुण पिढी वाईट मार्गाला लागणार नाही शिवाय महाराज हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहेत म्हणून स्मारक होणे आवश्यक वाटते
रमेश भापकर ( भाजप तालुकाध्यक्ष )

महाराजांचे स्मारक ही परतूर साठी अभिमानाची बाब राहील आणि शहराच्या मुख्य चौकात ते झाले म्हणजे शहराची शान अजून वाढून दिसेल
बाबासाहेब गाडगे ( काँग्रेस तालुकाध्यक्ष )

शिवस्मारक होणे अत्यंत गरजेचे आहे आणि आम्ही ते स्मारक उभे करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून काम करू.
श्याम बारकुल ( नागरिक परतूर )

शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे कारण परतूर शहरात अजून पर्यंत एकही महाराजांच स्मारक नाही महाराष्ट्र देशाच्या माध्यमातून आमचा पाठपुरावा होईल आशी अपेक्षा.
संतोष कातारे ( नागरिक परतूर )