पैठणच्या जुन्या सरकारी दवाखान्याजवळील अतिक्रमण काढण्याची मागणी

औरंगाबाद : पैठण शहरातील जुन्या सरकारी दवाखान्याच्या प्रांगणात व इमारतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या ठिकाणी नेहमी कुठल्या ना कुठल्या विषयाला धरुन हाणामारीचे प्रकार घडत आहे, या ठिकाणी दोघात मारा-मारी झाली, त्यामुळे परीसरात शेकडो लोकांचा जमाव जमा झाला होता. असेच प्रकार जर या ठिकाणी वारंवार घडत राहील्यास, कायदा सुव्यावस्थेच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, वेळीच या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरीकांडून होत आहे.

पैठणच्या जुन्या सरकारी दवाखान्याची इमारत सध्या अतिक्रमण धारकांचा अड्डा बनला असुन मनमानी पध्दतीने शासनाच्या मालमत्तेला ईजा पोहचवून या ठिकाणी अतिक्रमण होत आहे, काहींनी तर या इमारतीच्या आत आपले गोडावून देखील थाटली आहे तर प्रांगणात चहाचे बाकडे, टपर्या, रसवंत्या आदींनी अतिक्रमण केलेले आहे.

वेळीच हि इमारत न.पने ताब्यात घेऊन या ठिकाणी काही व्यावसायीक उपक्रम राबवण्याची मागणी मागे झाली होती, मात्र न.पने या विषयी पाठपुरावा केलाच नाही, तर दुसरीकडे किरायाने चालणारे शासकीय कार्यालये या ठिकाणी सुरु करण्याची मागणी पण झाली होती मात्र या विषयी देखील कोणत्याच राजकीय किवा सामाजीक संघटनेच्या पदाधिकारींनी पाठपुरावा केला नाही.

परीणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहे व अतिक्रमणावरुनच वारंवार या ठिकाणी भांडने तंटे होतच आहे, आज दुपारच्या सुमारास झालेली भांडने देखील एकदम फ्रि स्टाईल होती भांडने पाहण्यासाठी या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला होता.  हि भांडणे नित्याचीच असल्याचे परीसरातील लोक सांगतात, पोलिस प्रशासनासह तालुका प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन परीसर अतिक्रमण मुक्त करायला हवे, नसता या ठिकाणी कायदा व सुव्यावस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. असे नागरिकांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या