मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे. यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य करण्यापासून हायकोर्टाने या तिन्ही नेत्यांना रोखावे, अशी विनंती करणारी याचिका पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या हिमंता पाटील यांनी दाखल केली आहे. शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले असून ते असंतुष्ट आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनातून बाहेर येताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले कि, “आज माननीय राज्यपालांना ईमेल आणि थेट पत्र देऊन भाजपने मुख्यमंत्री आणि सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले. राज्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेचे 39 आमदार पक्षाबाहेर असून ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत नसल्याचे सातत्याने सांगत आहेत. म्हणूनच आम्ही माननीय राज्यपालांना तत्काळ मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यास सांगितले.”
महत्त्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<