गणपती बाप्पाला  राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी

पुणे : गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.आता याच बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी अशी अजब मागणी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी मागणी आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यांनी केली आहे . पुण्यात सुरु असणाऱ्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. धर्मनिरपेक्ष भारतात देवाला अशापद्धतीने  राष्ट्रदेव करण्याची मागणी करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय म्हणाले  आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा  ?

देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी. राष्ट्राचा नेताही गणपतीसारखा असायला हवा. गणपतीप्रमाणे मोठे कान हवेत. म्हणजे त्याने प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे. अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा आदर करावा. त्याची वाणी लोकांच्या भावनांचा आदर करणारी हवी. नाक मोठे असावे, म्हणजे लोकांच्या समस्या लगेच समजण्याची क्षमता असावी. राष्ट्रहिताची सर्व गुपिते पोटातच राहायला हवीत. त्याचे वाहन उंदीर म्हणजे जनता हवी. कररूपी ओझ्याने लोक दाबुन जाऊ नयेत.