सप्तश्रृंगी गडावर भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी

blank

नाशिक : नवरात्रौत्सव काळात सप्तश्रृंगी गडावर येणाऱ्या भक्तांना जिल्हा परिषदेच्या आरोग्यविभागातंर्गत आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात अशी मागणी जि.प. सदस्या डॉ. भारती पवार यांनी केली आहे. याबाबत डॉ. पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना निवेदन दिले आहे .

महाराष्ट्रातील साडेतीन विद्यापीठांपैकी सप्तश्रृंगी देवी आदयपीठ आहे. येत्या दि. २० ते ३० सप्टेंबर या कालावधीत सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक येत असतात. यातही प्रामुख्याने नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार या जिह्यातून भाविक पदयात्रेने येतात. याशिवाय हजारो कवडीधारक पायी चालत गडावर येतात. १०० ते २०० कि.मी. पायी प्रवास केलेल्या भक्तांना आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. मात्र, गडावर आवश्यकत ती आरोग्य सेवा उपलब्ध नाही.

भाविकांची यात्रा सुखरूप व्हावी यासाठी गडावर आरोग्य विभागातर्फे दोन कर्डियक ॲम्ब्युलन्स कुशल कर्मचाऱ्यांसह उपलब्ध करून द्याव्यात, पुरेसा औषधसाठा व साहित्यसह वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्यात यावेत, जिह्यातील आरोग्य कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने लगतच्या अन्य जिह्यातून आरोग्य कर्मचारी यांची मागणी करण्यात यावी.

सप्तश्रृंगीगडा प्रमाणेच नांदुरी, कोल्हापूरफाटा, अभोणा चौफुली येथे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने याभागात स्वतंत्र आरोग्य सेवा केंद्र उभारावेत अशी मागणी डॉ. पवार यांनी पत्राव्दारे केली आहे. चौकट स्वाईन फ्लू बाबात उपाययोजना व जगनजागृती करावी दरम्यान, शहरासह जिह्यात स्वाईन फ्लूची मोठी लागन झाली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला औषधसाठा, उपाययोजना गडावर तसेच गडाच्या परिसरात करण्यात यावी. गर्दीच्या ठिकाणई स्वाईन फ्लू आजाराबाबत योग्य ती जनजागृती करण्यात यावी अशी आग्रही मागणी डॉ. पवार यांनी मीना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे.