सृजन घोटाळ्याप्रकरणी नितीशकुमार, सुशील मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी

पाटणा : सृजन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी राजीनामा द्यावा अशी मागणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केली आहे. या प्रकरणी आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना या प्रकरणाची माहिती होती मात्र तरीदेखील त्यांनी या प्रकरणातील कोणावरही कारवाई केली नाही. याच कारणामुळे घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेली , असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही सृजन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.