मलबार हिल चे नाव बदलण्याची सेनेची मागणी, जाणून घ्या नवीन नाव

टीम महाराष्ट्र देशा – देशात शहरांची नाव बदलण्याची मोहीम जोरात चालू असतानाच आता मुंबईमधील मलबार हिलचेही नाव बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी मुंबई महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे. शिवसेनेचे सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे.

रामायणाच्या काळात सीतेच्या शोधात निघालेले राम आणि लक्ष्मण यांनी या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते. त्यामुळे मलबार हिलचे नाव बदलून ‘रामनगरी’ करावे, अशी मागणी केली आहे.त्यामुळे देशात सगळीकडे नाव बदलण्याची मोहीम चालू असतानाच आता मलबार हिलचं नाव बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

You might also like
Comments
Loading...