कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास सी.बी.आय कडे देण्याची मागणी

पुणे :- भिमाकोरेगावच्या हल्लेखोरांवर कारवाई करणेसाठी मुख्यमंत्र्यांनी १ जानेवारी रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्हयांचा तपास सी.बी.आय. कडे देण्याची मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

याच निवेदनात प्रमुख मास्टर माइंड असणाऱ्या संभाजी भिडे यांचेवर देखील अटकेची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच दोन वर्षानंतरही केवळ दहा टक्केच आरोपीना अटक करण्यात आली असून संपूर्ण तपास थांबविण्यात येवून अद्यापपर्यंत कोणत्याही गुन्हयात चार्जशिट दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर गुन्हयाचा तपास सी.बी.आय. मार्फत होण्याची आवश्यकता असल्याचे माजी गृहमंत्री रमेश बागवे तसेच रिपब्लिकन युवा मोचचि पक्षनेते राहुल डंबाळे यांनी नमूद केले आहे.

दोन वर्षानंतर देखील दंगलखोरांना अटक न होणे हे भाजपचे पाप असून यापुढील काळात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून सर्व तपास सी.बी.आय द्वारे होणे आवश्यक असून चौकशी आयोगाला होत असलेला विलंब हे देखील आंबेडकरी समुदायाच्या नाराजगीचे मुख्य कारण आहे. नियोजित वेळेत भिमाकोरेगाव चौकशी आयोगाने देखील आपले काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मत रमेश बागवे यांनी व्यक्त केले.

आंदोलना मध्ये मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अंजुम इनामदार, इंडियन मुस्लिम फ्रंटचे मुनवर कुरेशी, बहुजन संघर्ष सेनेचे कृष्णा आदमाने यांचेराह राहुल तायडे, स्नेहल कांबळे, अजय लोंढे, गौरव जाधव, विठ्ठल गायकवाड, राजू शिरसाट, फकिर इनामदार, रुपाली काळभोर, संतोष डंबाळे, शालन कांबळे, धम्मानंद क्षिरसागर, नागेश मिसाळ, यांचेसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या