आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने १० कोटींची मागणी

ठाणे: ठाण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने १० कोटींची मागणी करणारा फोन आला त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

विधान परिषदेवर आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने १० कोटींची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून ही मागणी करण्यात आली होती. चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाने पैशाची मागणी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

२५ लाख स्वीकारणाऱ्या महिलेसह एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अशा पद्धतीने आणखीही लोकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.