CWG2018: राष्ट्रपतींनी केले कुस्तीपटू राहुल आवरेचे कौतुक

rahul-aware

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीपटू राहुल आवारेनं सुवर्णपदक पटकावले आहे. राहुलनं ५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टिफन ताकाहशीचा पराभव केला. १५ -७ अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केलं. राहुलच्या या कामगिरीबद्दल भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सेमीफायनलमध्ये राहुल आवारेने भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी देश असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला धोबीपछाड दिला.राहुलनं मोहम्मद बिलालचा १२-८ असा पराभव अतिशय अटीतटीच्या सामन्यात राहुल आवारेने कडवी झुंज देत 12-8 असा विजय मिळवला. या विजयानंतर फायनलमध्ये धडक देत त्याने भारतासाठी पदक निश्चित केलं होत.

राहुलने याआधी त्याच्या दोन सामन्यात तांत्रिक वर्चस्वाच्या जोरावर उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. राहुलने पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या जॉर्ज रामवर 4-0 असा विजय मिळवला होता. राहुलच्या तुलनेत जॉर्ज कामगिरी फारच सुमार असल्याने रेफ्रीने राहुल आवारेला विजयी घोषित केलं.पुढच्या सामन्यात राहुल आवारेने ऑस्ट्रेलियाच्या थॉमस चिचिहिनीला मात देऊन उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता .

दरम्यान,राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदकविजेत्यांना महाराष्ट्र शासनाकडून रोख इनामांची घोषणा करण्यात आली आहे.पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 50, 30 आणि 20 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे.