नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील हे आंदोलन सुरु असून आज शेतकऱ्यांनी दिल्लीतील सीमांमधून आत येऊन ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.
या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला तीन सीमांमधून दिल्लीत प्रवेश करून हा ट्रॅक्टर मोर्चा पुढे चाललेला होता. मात्र शेतकरी अधिक आक्रमक झाले व हा जत्था लाल किल्याकडे जात असताना पोलीस व आंदोलक भिडल्याचं दिसून आलं.
हे आंदोलन आता शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी लाल किल्ला देखील काबीज केल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलकांनी दगडफेक केली, ट्रॅक्टर पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आखून दिलेला मार्ग सोडून हे आंदोलक इतर भागात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस अश्रूधूर, लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
या हिंसाचारावर शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया देतानाच निषेध देखील नोंदवला आहे. ‘हिंसा करणारे आमचे आंदोलक नाहीत. आजच्या दिवशी जे घडलं ते घृणास्पद आणि लाजिरवाणं आहे. हिंसा करणं अयोग्य आहे, ‘ असं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्य
- अर्थसंकल्पात घेण्यात येणार ‘राष्ट्रीय बँक’ स्थापनेचा निर्णय !
- जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021-22 साठी 520.78 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
- शेतकरी आंदोलन चिघळले; पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकर्त्यांनी उपसल्या तलवारी!
- ‘शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आठवलेंनी माफी मागावी’
- प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघणे, हे फार दुर्दैवी आहे; मुश्रीफांची केंद्र सरकारवर टीका