दिल्लीच्या शिलेदारांचा पंजाबवर पुन्हा ७ गडी राखुन विजय; गुणतालीकेत पहिल्या स्थानी झेप

आहमदाबाद : आपयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने पंजाब किंग्सचा ७ गडी राखुन पराभव केला आहे. पंजाबने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य ३ गडी गमावत अवघ्या १८व्या षटकात पार केले. ९९ धावांची खेळी करणारा पंजाबचा कर्णधार मंयक अग्रवाल हा सामनावीराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पंजाबचा नियमीत कर्णधार के एल राहुलच्या अनुपस्थीतीत कर्णधार मंयक अग्रवाल आणि प्रभसिमरन सिंग यांनी डावाची सुरुवात केली. मात्र चौथ्याच षटकात प्रभसिमरन १२ धावांची भर घालुन तंबुत माघारी परतला. यानंतर ख्रिस गेल(१३) आणि टी-२० मधील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू डेव्हिड मलन(२६) दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. तर मधल्या फळीतील इतर फलंदाज दुहेरी अकडाही पार करु शकले नाही. मंयक अग्रवालच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारीत २० षटकात ६ गडी गमावत १६६ धावांची मजल मारली. पंजाबकडून मंयकने सर्वाधिक ५८ चेंडुत ८ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ९९ धावांची नाबाद खेळी केली. तर दिल्लीकडून कासिगो रबाडाने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

पंजाबने दिलेल्या १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचे समलामीवीर पृथ्वी शॉ(३९) आणि शिखर धवन(६९)* यांनी पुन्हा एकदा चांगली सुरुवात करुन दिली. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर शिखर धवनने अर्धशतक झळकावले. यावेळी धवनने स्टिव्ह स्मिथ(२४), कर्णधार रिषभ पंत(१४) आणि शिम्रॉन हेटमायर(१६) यांच्या साथीने आठराव्या षटकात दिल्लीला विजय मिळवुन दिला. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवन आखेरच्या चेंडुपर्यंत नाबाद राहत ४७ चेंडुत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ६९ धावा केल्या. या विजयासह दिल्लीने गुणतालीकेत पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या