fbpx

दिल्लीवासीयांनी केजरीवालांचे राज्यसरकार हटवावे – रामदास आठवले

आठवले

नवी दिल्ली – दिल्लीवासीयांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे दिल्लीवसीयांचा विश्वास केजरीवाल यांच्यावरून विश्वास उडाला आहे. गरिबांना मोफत वीज पाणी देण्याचे आश्वासन विसरलेल्या अरविंद केजरीवालांचे राज्यसरकार आगामी निवडणुकीत दिल्लीवसीयांनी हटवावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले. नवी दिल्लीतील सुल्तानपुरा येथे रिपब्लिकन पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली . यावेळी झालेल्या जाहीर सभेत ना. आठवले बोलत होते, यावेळी हजारो दिल्लीवासी उपस्थित होते. या सभेचे आयोजन सतीशकुमार नैया, अनिल कुमार प्रकाश कुमावत, सुशीलकुमार गौतम आदी रिपाइं कर्यकर्त्यांनी केले होते.

सुल्तानपुरी येथे आयोजित रिपाइं शाखा स्थापना सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात यावेळी जाहीर प्रवेश केला.नवी दिल्लीत गरीब झोपडीवासीयांना चांगले घर मिळण्यासाठी मुंबईत राबविण्यात आलेल्या एस.आर.ए. योजनेप्रमाणे दिल्लीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना दिल्ली राज्यसरकार ने सुरू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून दिल्लीत एस.आर.ए. योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकार तर्फे आपला प्रयत्न असल्याचे ना रामदास आठवलेंनी यावेळी जाहीर आश्वासन दिले.