‘या चर्चेत आम्ही कॉमन सेन्स वापरतोय, अन् तुम्ही…’, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं

‘या चर्चेत आम्ही कॉमन सेन्स वापरतोय, अन् तुम्ही…’, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं

Narendra Modi

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीमध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दिल्लीतील प्रदूषण हा आता गंभीर होत चालला आहे. याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी तण जाळत असल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे. या शेतकऱ्यांना तण हटवण्यासाठी यंत्रसामग्री पुरवण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान न्यायालयानं केंद्र सरकार आणि प्रशासनाला फटकारलं आहे. दिल्ली प्रदूषण या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकार आणि प्रशासनाला परखड सवाल केले आहेत.

गेल्या ५ वर्षांत होत असलेल्या सरासरी प्रदूषणाची आकडेवारी घेऊन त्यानुसार प्रदूषण टाळण्यासाठी वर्षातील सर्वाधिक प्रदूषणाच्या दिवसांच्या आधीच त्यावर योग्य ते उपाय राबवण्यासाठी केंद्रानं पावलं उचलायला हवीत, असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सांगितले आहे.

दिल्ली प्रदूषण या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कॉमन सेन्स वापरत आहोत. पण केंद्र सरकार आणि प्रशासन नेमकं करतंय काय? प्रत्यक्ष शेतावर जाऊन, शेतकऱ्यांशी चर्चा करून, वैज्ञानिकांसोबत बोलून या तण जाळण्याच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा सरकार का काढत नाही?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या