दिल्ली पोलिसांनी अद्भुत संयम बाळगला – प्रकाश जावडेकर

prakash javdekar

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.

हे आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेले होते. या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागल्याने राजकीय नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी देखील आंदोलकांच्या आक्रमक कृत्याचं निषेध केला आहे. दरम्यान, आक्रमक आंदोलकांनी शेतकऱ्यांवर तलवारी उगारल्याचे देखील दिसून आले होते. तर, काही ठिकाणी पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले.

पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे समजताच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, आंदोलक त्याने देखील मागे सरले नाहीत. लाल किल्ल्यावर ताबा मिळवून विविध झेंडे या आंदोलकांनी फडकावले. तर, लाल किल्ल्यातील सामग्रीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. बस, पोलीस गाड्या याच नुकसान झालं. या सर्व घटनेमध्ये पोलिसांनी अद्भुत संयम राखला. राष्ट्र असून देखील आंदोलकांवर त्यांनी ते चालवले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. अनेक पोलीस हे गंभीर जखमी देखील झाले आहेत. त्यांच्या धैर्याचं कौतुक असल्याचा उल्लेख आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

महत्वाच्या बातम्या