सत्याचा विजय झाला- केजरीवाल

दिल्ली उच्च न्यायालयाचा आम आदमी पार्टीला मोठा दिलासा

टीम महाराष्ट्र देशा- लाभाचे पद स्वीकारल्यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेल्या आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द करत न्यायालयाने या २० आमदारांचं सदस्यत्व कायम ठेवलं आहे. तसंच या प्रकरणावर पुन्हा एकदा सुनावणी करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ‘सत्याचा विजय झाला’ टि्वट आपचे संयोजक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले होते. निवडणूक आयोगाने १९ जानेवारीला लाभाचे पद बाळलगल्या प्रकरणी आपच्या २० आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.दोनच दिवसात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मंजूर केली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या आमदारांना पात्र ठरवतानाच पुन्हा हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे.