fbpx

रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ, दिल्ली उच्च न्यायालयाने धाडली नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनिलॉंड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना मिळालेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याच बाबत आज दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. रॉबर्ट वाड्रा व त्यांचे सहकारी मनोच अरोरा यांना आज नोटीस पाठवली आहे. ही नोटीस अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवरून पाठवण्यात आली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे. राॅबर्ट वाड्रा यांना १७ जुलैपर्यत ईडीच्या याचिकेवर उत्तर देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

दरम्यान भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले गांधी कुटुंबियांचे जावई रॉबर्ट वाड्रा अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत. लंडनमध्ये वढेरा यांची १.९ लक्ष पौंडांची मालमत्ता असल्याचा संशय आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘ईडी’कडून वाड्रा यांची चौकशी सुरु आहे.