पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दणका दिला आहे. पी. चिदंबरम यांचा आयएनएक्स मिडिया घोटाळ्या प्रकरणी अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे पी. चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता आहे.

तसेच चिदंबरम यांची मुदतवाढही कोर्टाने फेटाळली आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तीन दिवसांची मुदतवाढ मागितली होती. मात्र न्यायालयाने मुदतवाढ फेटाळली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज आणि तीन दिवसांचा स्थगिती फेटाळून लावल्यानंतर आता ईडी आणि सीबीआय यांना लवकरच चिदंबरम यांना अटक करण्याची शक्यता आहे.

दरम्यान चिदंबरम यांच्यावर परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून आयएनएक्स मीडियाला बेकायदेशीरपणे मान्यता देण्यासाठी 305 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत अंतरिम संरक्षणासाठी चिदंबरम यांना सुमारे दोन वेळा कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. चिदंबरम अर्थमंत्री असताना ही घटना 2007 ची आहे.