कठुआ प्रकरण : बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणाऱ्याला सहा महिन्याचा तुरुंगवास

टीम महाराष्ट्र देशा : कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणात बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणाऱ्याला दिल्ली हायकोर्टाने सहा महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 25 एप्रिलला होणार आहे.

जम्मू कश्मीर येथील कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्यासाठी देशातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत तर काही अंशी या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचे राजकारण सुद्धा सुरु झाले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय सुनावला आहे.

काय आहे प्रकरण ?

10 जानेवारीला असिफा खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीनं अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानूष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर असिफाची हत्या केली.शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला असिफाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली.17 जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला.Loading…
Loading...