धरणे देत असलेल्या आरोग्यमंत्र्यांचं आरोग्य बिघडलं

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या सात दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री त्यांच्या मागण्यांसाठी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत.

या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी रात्री तब्येत बिघडली. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. सध्या त्यांना ग्लुकोज देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बाकीच्या मंत्र्यांचे दैनंदिन रुटिन चेकअप सुरु आहे. रविवारी सकाळपासून सत्येंद्र जैन यांची तब्येत खालवली होती. तपासणी केली त्यावेळी त्यांचे वजन 78.5 किलो असल्याची नोंद होती. दरम्यान, सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ट्विटवरुन दिली आहे.