एकाच घरात ११ मृतदेह सापडल्याने दिल्ली हादरली, आत्महत्या कि हत्या गूढ कायम

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये एकाच घरात ११ मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे, दिल्लीतील बुरारी भागामध्ये असणाऱ्या घरात लटकलेल्या अवस्थेत हे ११ मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

सर्व मृत व्यक्ती या एकाच कुटुंबातील असून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कुटुंबातील सर्व व्यक्ती दूध आणि फर्निचर व्यवसायाशी संबंधित आहेत.

मृतांपैकी 10 जणांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येनं आत्महत्या करण्याच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.