‘अडचणीच्यावेळी दिल्लीची नाय गल्लीची बाय कामी येते’

टीम महाराष्ट्र देशा : अडचणीच्यावेळी दिल्लीतील नाही तर गल्लीतलीच बाई कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे.पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली, नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. मी हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्वास आहे.असे म्हणत आत्महत्या केलेल्या शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नीने ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.यावर्षीचे साहित्य संमेलन गाजले ते सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून पाठवण्यात आलेले निमंत्रण सुरक्षेचे कारण सांगून रद्द करण्यात आले होते.त्यावरून आयोजकांवर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली.त्यानंतर आयोजक कुणाला उद्घाटक म्हणून बोलवते याबद्दल उस्तुकता लागून राहिली होती.अखेर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाने सावध पावले उचलत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीकडून उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

You might also like
Comments
Loading...