दिल्लीच्या निकालावर गौतम गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया

Gambhir gautam

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.

भाजप खासदार गौतम गंभीरची दिल्ली निकालावर प्रतिक्रिया एका माध्यमांशी बोलताना दिली. याबाबत बोलताना गंभीर म्हणाला की, ‘दिल्ली निकाल आम्ही स्वीकारला,’ अशी त्यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. तसेच अरविंद केरजीवाल यांचं कौतुक देखील त्याने केले.

Loading...

पुढे बोलताना तो म्हणाला, ‘दिल्लीच्या नागरिकांच देखील कौतुक. आम्ही आमच्याकडून पूर्ण तयारी केली होती. पण आम्ही दिल्लीच्या जनतेला म्हणणं पटवून देण्यात कमी पडलं. आशा आहे की, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मदतीने प्रगती करेल,’ असे तो म्हणाला.

दरम्यान, ‘मागील वेळी भाजपच्या तीन जागा होत्या. त्या आता १३ पर्यंत गेल्या आहेत. त्यामुळं अपेक्षित यश मिळालं नाही एवढंच म्हणता येईल’. आतापर्यंतच्या निकालानुसार आम आदमी पक्ष ५८ जागी तर, भाजप अवघ्या १२ जागी आघाडीवर आहे. त्यामुळं भाजप बचावात्मक पवित्र्यात गेला आहे. ‘भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही,’ अशी सावध प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन